कोलकाता बलात्कार प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, संदीप घोष आणि SHO अटक
Kolkata News : कोलकातामध्ये महिला डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणात आता सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. आरजी कर हॉस्पिटलचे माजी मुख्याध्यापक संदीप घोष आणि एका ठाण्याचे SHO यांना अटक केली आहे.
Kolkata Rape Murder Case : कोलकाताच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ज्युनिअर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात सीबीायने कॉलेजचे माजी प्रिंसिपल संदीप घोषला यांना अटक केली आहे. तसेच घोषसोबतच सीबीआयने ताला पोलीस स्टेशनचे SHO अभिजीत मंडलला देखील अटक केले आहे.
सीबीआयने यापूर्वी आर्थिक अनियमिततेप्रकरणी डॉ. संदीप घोष यांना अटक केली होती. सीबीआयच्या कोलकाता मुख्यालयात त्यांची सतत चौकशी सुरू होती. यावेळी सीबीआयने संदीप घोषसह अनेक ठिकाणी छापे टाकले आणि त्यांना अनेक गुंतागुंतीचे प्रश्न विचारले, ज्यांचे ते स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर सीबीआयने या घटनेतील त्याची संशयास्पद भूमिका आणि सापडलेल्या पुराव्याच्या आधारे त्याला अटक केली.
SHOलाही अटक
यासोबतच या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे न केल्याने आणि या हत्येला आत्महत्येसारखे भासवल्याप्रकरणी तळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिजीत मंडल यांनाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यापूर्वी सीबीआयने एसएचओ अभिजीत मंडल यांची अनेक वेळा कसून चौकशी केली. यावेळी त्यांना बलात्कार-हत्या प्रकरणाच्या तपासात डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबाबत अनेक भेदक प्रश्न विचारण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसएचओ त्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊ शकले नाहीत, त्यानंतर एजन्सीने त्याला औपचारिकपणे अटकही केली.
9 ऑगस्ट ठरली काळरात्र
आरजी कार हॉस्पिटल, कोलकाता येथील एक ज्युनिअर डॉक्टर 9 ऑगस्ट रोजी सकाळी तिसऱ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत आढळली होती. बलात्कारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात पीडितेला 14 गंभीर जखमा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला मुख्य आरोपी म्हणून अटक केली होती. त्यानंतर कुटुंबीयांच्या मागणीनुसार कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला.