Land For Job Scam : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या घरी धडकलं CBI पथक
What Is Land For Job Scam: जमिनीच्या बदल्यात नोकरी या प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचं पथक दाखल. नेमकं काय होतं प्रकरण? पुन्हा अनेकांनीच उपस्थित केला हा प्रश्न.
Land For Job Scam: बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या पटना येथील निवासस्थानी मंगळवारी सीबीआयच्या पथकानं धडक दिली. जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणावरील कारवाईसाठी हे पथक तिथं दाखल झालं. (CBI reaches former Bihar CM Rabri Devis residence in land for job case latest Marathi news)
सूत्रांच्या माहितीनुसार चौकशीसाठी सीबीआयचं पथक राबडी देवी यांच्या निवासस्थानी दाखल झालं. दरम्यान, चर्चांना वाव मिळू लागताच सीबीआय अधिकाऱ्यांनी पुढे येत ही धाड नसल्याचं स्पष्ट करत राबडी देवी यांच्या घरी कोणत्याही प्रकारची झडती घेण्यात आली नसल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे तर सदर प्रकरणी यापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून, विशेष न्यायालयानं माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांसह इतर काही मंडळींना 15 मार्च रोजी न्यायालयापुढं हजर राहण्यासाठी समन्सही बजावलं आहे.
काय आहे हे प्रकरण?
तपास यंत्रणा सध्या या प्रकरणातील आणखी धागेदोरे शोधण्याची मोहिम हाती घेताना दिसत आहे. हे प्रकरण लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला भेट स्वरुपात भूखंड देत किंवा तो विकण्याच्या बदल्यात रेल्वे विभागात कथित स्वरुपाय नोकरी दिली जाण्याशी संबंधित असल्याचं कळत आहे. हे सर्वकाही लालू प्रसाद यादव 2004ते 2009 दरम्यान रेल्वे मंत्री असताना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आतापर्यंतच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार आरोपींनी मध्य रेल्वेमध्ये त्यावेळी तत्कालीन महाप्रबंधक आणि केंद्रीय रेल्वे सीपीओ यांच्यासोबत कट रचला होता. ज्यानंतर भूखंडाच्या बदल्यात त्यांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावे नोकरीची पदं बहाल करम्याक आवी होती.