नवी दिल्ली : नोटबंदीला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. यानंतर बँका, पोस्ट ऑफिस, रेल्वे आणि विमा कंपन्यांमध्ये 77 प्रकरणांची नोंद झाली आहे जेथे काळा पैसा जमा केला गेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या 77 प्रकरणांमध्ये सुमारे 395.19 कोटींची उलाढाल झाल्याची शक्यता आहे. सीबीआयला सामान्य नागरिक आणि बाकी इतर एजन्सींकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई केली गेली आहे.


तपासणीदरम्यान सीबीआयने या प्रकरणी संबंधित 307 पैकी 21 सरकारी कर्मचारी, 26 खासगी व्यक्तींना अटक केली आहे.