नवी दिल्ली : सीबीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक नियम केंद्राने आणला आहे. विद्यार्थी खरोखर गुणवान असेल तर आता त्याचं एक वर्ष वाया जाणार नाही. दहावीच्या CBSE बोर्डाच्या परीक्षेत त्या अर्थाने कुणीच एखाद्या विषयाच नापास होणार नाही. सीबीएसईच्या नव्या नियमानुसार, दहावीचा विद्यार्थी गणित (mathematics) किंवा विज्ञानात (science) नापास झाला आणि त्यानं ऐच्छिक विषय म्हणून घेतलेल्या कौशल्याधारित विषयात (skill subject) उत्तीर्ण झाला तर त्याला पास असल्याचंच समजलं जाईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (artificial intelligence), इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स इत्यादी हे ऐच्छिक विषय आहेत. यानंतर दहावीची टक्केवारी 'बेस्ट ऑफ फाईव्ह सब्जेक्ट्स'च्या आधारावर ठरवली जाईल.


या निर्णयाचं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनीही जोरदार स्वागत केलं आहे. भारत सरकारचं (Government of India) 'स्किल इंडिया इनिशिएटिव्ह'सुद्धा समोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.



CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक २ फेब्रुवारीला घोषित केले जाईल. जाहीर झाल्यावर दहावी आणि बारावीच्या परीक्षांची डेटा शीhttps://www.cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे.