नवी दिल्ली: CBSE आणि महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. CBSE बोर्डाची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तर प्रॅक्टिकल परीक्षा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दिल्लीच्या शिक्षण संचालक उदित राय यांचा असल्याचं सांगितलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण संचालक उदित राय वादात अडकले आहेत. व्हिडीओमध्ये सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी उत्तर येत नसेल तर काहीतरी लिहा पण उत्तरपत्रिका भरा त्या रिकाम्या ठेवू नका असं सांगताना दिसत आहेत. तुम्ही लिहिलं तर गुणही मिळतील असंही ते विद्यार्थ्यांना सांगत आहेत. या व्हायरल व्हिडीओमुळे उदित राय वादात अडकले आहेत. 



बारावीच्या विद्यार्थ्यांशी बोलताना दिल्लीचे शिक्षण संचालक उदित राय म्हणाले की, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला (सीबीएसई) च्या विद्यार्थ्यांसाठी अजब दावा केला आहे. विद्यार्थ्यांनी जर उत्तर पत्रिका भरलेली असेल तर त्यांना गुण द्या.


शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दिलेल्या या अजब सल्ल्यामुळे आता राय यांच्यावर टीका होत आहे. या व्हिडीओवरून भाजप विरुद्ध काँग्रेस नेत्यांमध्ये देखील सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. तर वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी राय यांच्या सल्ल्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याची सारवासारव देखील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केली आहे. 


हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्यानंतर उदित राय यांनी मौन धरलं आहे.राय यांनी व्हिडीओवर बोलणं देखील टाळलं आहे. सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनीही यावर बोलण्यास करण्यास नकार दिला. त्यामुळे आता CBSEकडून काय कारवाई होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.