CBSE 12th Result 2023 OUT : सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावी परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी लागलेल्या निकालानुसार बारावीच्या परीक्षांमध्ये 87.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यंदाच्या वर्षी CBSEची मेरीट लिस्ट नाही ही बाब विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यावी. 


घरसबसल्या किंवा आहात त्या ठिकाणाहून कसा पाहाल निकाल? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी cbseresults.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. 
- तिथं होमपेजवर CBSE Board Class 12th Result 2023  या लिंकवर क्लिक करावं. 
- आता विद्यार्थ्यांनी आपला परीक्षा क्रमांक तिथे टाकावा. 
- क्रमांक देताच पुढच्या क्षणाला तुमच्यासमोर निकाल दिसेल. 
- आता हा निकाल पाहून तुम्ही तो डाऊनलोड करा. 


हेसुद्धा वाचा : IRCTC कडून Bahar E Kashmir Tour Package; खिशाला परवडणाऱ्या दरात पाहा भारतातील नंदनवन 


यंदाच्या वर्षी तब्बल 16,60,511 विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 14,50,174 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहता 87.33 टक्के विद्यार्थ्यांनी हा शैक्षणिक टप्पा ओलांडला. 


मुलींनीच मारली बाजी... 


मागील वर्षाच्या तुलनेत निकालाची आकडेवारी पाहिल्यास उत्तीर्म विद्यार्थ्यांची संख्या 5 टक्क्यांनी घटली. 2022 मध्ये तब्बल 92.71 टक्के विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. दरम्यान यंदाच्या वर्षी निकालाचा सर्वाधिक जल्लोष त्रिनानंदपुरम येथे पाहायला मिळणार आहे. कारण, इथं 99.91 टक्के विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन एका नव्या टप्प्यावर पोहोचले आहेत. 



यंदाच्या निकालांमध्येही मुलींनीच बाजी मारली. टक्केवारीनिहाय आकडा पाहिल्यास सीबीएसईच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षेमध्ये मुलींचा निकाल 90.68% लागला असून, मुलांचा निकाल 84.67% आहे. या परीक्षेमध्ये 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1,12,838 आहे. तर, 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 22,622 इतकी आहे. 


सीबीएसई बोर्डाचे इयत्ता बारावीचे निकाल लागलेले असतानाच आता इयत्ता दहावी आणि सोबतच महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या एसएससी (SSC) आणि एचएससी (HSC) चे निकाल कधी लागणार याचीच उस्तुकता आणि धाकधूक विद्यार्थी आणि पालकांमध्ये पाहायला मिळत आहे.