Video Viral: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. त्यात काही हसविणारे असतात तर काही मजेशीर असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. भीषण आणि भयानक असे अपघाताचे व्हिडीओही सोशल मीडियावर आपण पाहत असतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. रस्त्याकडे असलेल्या दुकानात बसणे पण धोकादायक आहे असंच हा व्हिडीओ पाहिलावर वाटतं. 



नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ पाहिल्यावर यूजर्सला विश्वास बसणार नाही की नेमकं झालं तरी काय? तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, एका दुकानात एक व्यक्ती बसला आहे. त्याने समोर काही तरी येताना पाहिलं आणि तो उठून पळाला. समोर एक ट्रक वेगाने दुकानाच्या दिशेने येत होता. अचानक हा ट्रक आला आणि दुकानात घुसला. या दुर्घटनेत दुकानदार, सायकलवाला णि एक इ-रिक्शामधून उतरलेला व्यक्ती थोडक्यात वाचले. ही घटना 19 तारखेची असून उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातील पुरंदरपूरमधील आहे. हा ट्रक गोरखपूर ते नेपाळ जात असताना ट्रक चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे. 



या तिघांनी अनियंत्रित झालेल्या ट्रकला आपल्याकडे येताना वेळीच पाहिल्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.