नवी दिल्ली : बुधवारी तामिळनाडूमध्ये अतिशय भीषण अशा दुर्घटनेमध्ये भारतानं देशाचे पहिले सीडीएस, जनरल बिपीन रावत यांना गमावलं. अतिशय गंभीर स्वरुपाच्या या हेलिकॉप्टर अपघातामध्ये एकूण 13 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जनकरल रावत यांच्या पत्नी, मधुलिका रावत यांचाही समावेश होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता सारा देश हळहळला. 



सूत्रांच्या माहितीनुसार जनरल बिपीन रावत यांच्या ज्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, त्यातून दुर्घचटनाग्रस्तांना बाहेर काढल्यानंतर डीएनए चाचणीनंतरच त्यांची ओळख पटवण्यात आली होती.


दरम्यान, सध्या अशीही माहिती समोर येत आहे की या भयावह दुर्घटनेनंतर ज्यावेळी बिपीन रावत यांचा शोध घेतला गेला, त्यावेळी त्यांनी त्यांचं नाव सांगितलं होतं, असा खुलासा प्रत्यक्षदर्शीकडून करण्यात आला आहे. 


बचावकार्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्यांपैकी एका व्यक्तीनं याचा खुलासा केला. 


माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार बचावकार्य पथकाकडून दोन व्यक्तींना घटनास्थळावरुन वाचवण्यात यश आलं होतं. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजेच जनरल बिपीन रावत.


रुग्णालयात नेत असतानाच त्यांनीहळू आवाजात आपली ओळख सांगत नाव उच्चारलं होतं. पण, वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


असं आयुष्य जगत होते भारताचे पहिले CDS जनरल बिपीन रावत, पाहा फोटो


 


बिपीन रावत यांनाही बरीच क्षती पोहोचली होती. त्यांचा शरीराचा खालचा भाग जळाला होता. ज्यामुळं त्यांना एका चादरीत गुंडाळून रुग्णवाहिकेपर्यंत आणलं गेलं. 


अग्निशामन पथकालाही या बचावकार्यात बऱ्याच अडचणी आल्या होत्या. या दुर्घटनास्थळावरुन 12 मृतदेह ताब्यात घेतले गेले. तर, दोघांना जीवंत अवस्थेत बाहेर काढण्यात यश आलं. पण, त्यांनाही बऱीच इजा झाली होती. 


बाहेर काढलेल्या दोन व्यक्तींपैकी दुसऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे, ग्रुप कॅप्टन वरुण सिंग. कॅप्टन सिंग यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.