केंद्र सरकारने हज यात्रेवर मिळणारे अनुदान केले कायमचे रद्द
केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
हज यात्रेला मिळणारी सब्सिडी पूर्णपणे बंद केली जात आहे. केंद्रीय अल्पसंख्यकांचे मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की हज यात्रेला मिळणारी सब्सिडी कायमची रद्द केली आहे. म्हणजे यावर्षी जवळपास 1.75 लाख मुस्लिम सब्सिडीशिवाय हजला जाणार आहेत.
केंद्रीय मंत्री नकवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या सब्सिडीचा वापर हा अल्पसंख्याक सुमदायातील विद्यार्थिनी आणि महिलांच्या शिक्षणाकरता आणि त्यांच्या सशक्तीकरणाकरता हे वापरले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या समाजातील लोकांना याचा फायदा होणार आहे. सब्सिडीचा फायदा मुस्लिम समाजाला न होता काही संस्थांना होत होता.
सरकारने आता 45 वर्षीय महिलांना यापुढे मेहरम शिवाय हजमध्ये जाण्याची परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे 45 वर्षापेक्षा कमी वयाच्या महिलांना देखील मेहरम शिवाय परवानगी मिळण्याची शक्यता आहे.