नितीन गडकरी यांची मोठी घोषणा! आता सर्व कारमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य
नितीन गडकरी यांनी ट्विट करत दिली माहिती
6 Airbags In Cars:कारमध्ये सहा एअरबॅग (airbag) अनिवार्य करणाऱ्या नियमाची अंमलबजावणी केंद्र सरकारने पुढील वर्षापर्यंत पुढी ढकलली आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून कारमध्ये 6 एअरबॅग (airbag) बसवण्याची अट एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ऑक्टोबर 2023 पासून त्याची सक्तीने अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे. प्रवासी कारसाठी सहा एअरबॅगचा नियम आता ऑक्टोबर 2023 पासून लागू होईल, असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी 8 आसनी वाहनांमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग अनिवार्य केले होते. याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून लागू होणार होती. पण आता एका वर्षासाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव जागतिक स्तरावर पुरवठा साखळीतील अडचणींमुळे वर्षभरासाठी पुढे ढकलण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सहा एअरबॅग्सच्या संदर्भात ही माहिती दिली आहे. "जागतिक पुरवठा साखळीतील अडचणी आणि आर्थिक अडचणींमुळे वाहन उद्योगावर नकारात्मक परिणाम झाला आहे. कच्च्या मालाच्या पुरवठ्यात सातत्याने घट होत आहे, अशा परिस्थितीत 6 एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव आता 01 ऑक्टोबर 2023 पासून प्रभावीपणे राबवला जाईल," असे नितीन गडकरी म्हणाले.