नवी दिल्ली : कॅबिनेट सचिवांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून राज्यांना लॉकडाउनचं गंभीरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारकडून आदेश देण्यात आला आहे की, सगळ्या राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्या पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने म्हटलं कीसृ, फक्त महत्त्वाच्या गोष्टींनाच प्रवास करण्याची परवानगी दिली जावी. DM अॅक्टनुसार डीएम आणि एसपी यांच्याकडे याची जबाबदारी असेल. आवश्यक वस्तूंच्या गोष्टींचा पुरवठा होणं आवश्यक आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांनना १४ दिवसासाठी क्वारंटाइन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


भारतात आतापर्यत १०७१ जणांना कोरोना झाला आहे. ज्यामध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे तर तर ९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी २१ दिवस महत्त्वाचे आहेत. जर या २१ दिवसात यावर नियंत्रण नाही मिळवता आलं तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.