नवी दिल्ली : देशातल्या भिकाऱ्यांची यादी सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी जाहीर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्र्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी आहेत. पश्चिम बंगाल पाठोपाठ उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि बिहार या राज्यांचा नंबर लागतो.


पश्चिम बंगालमध्ये एकूण ८१,२४४ भिकारी आहेत. यातले ३३,०८६ पुरुष तर ४८,१५८ महिला आहेत. उत्तर प्रदेशमध्ये ६५,८३५ भिकारी आहेत. यातले ४१,८५९ पुरुष आणि २३,९७६ महिला आहेत. आंध्र प्रदेशमध्ये ३०,२१८ भिकारी आहेत. यातले १६,२६४ पुरुष आणि १३,९५४ महिला आहेत. महाराष्ट्रामध्ये २४,३०७ भिकारी आहेत. यातले १४,०२० पुरुष आणि १०,२८७ महिला आहेत. 


कोणत्या राज्यात किती भिकारी, पाहा संपूर्ण यादी