केंद्र सरकारी कर्मचा-यांना निवृत्तीच्या दिवशीच मिळणार पीएफ-पेन्शन
केंद्र सरकारी कर्मचा-यांना सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारी कर्मचा-यांना आता त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच पीएफ तसंच पेन्शन मिळणार आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचा-यांना सरकारनं दिलासा दिला आहे. केंद्र सरकारी कर्मचा-यांना आता त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच पीएफ तसंच पेन्शन मिळणार आहे.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. तर ग्रॅच्युटीची रक्कम सुद्धा तीस दिवसांच्या आत दिली जाणार आहे. देशात सध्या सुमारे 49 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आहेत तर 55 लाखांहून अधिक निवृत्त कर्मचारी आहेत. यामुळे कर्मचा-यांचा निवृत्तीनंतर कार्यालयाच्या खेपा मारायचा त्रास वाचणार आहे.