नवी दिल्ली : राज्यासह देशात कोरोनाचा जोर बऱ्यापैकी ओसरला आहे. कोरोना नियंत्रणात आला आहे. मात्र अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाहीये. त्यामुळे कोरोना रोखण्यसाठी केंद्र सरकारने अखेर बहुप्रतिक्षित निर्णय अखेर घेतला आहे. मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची माहिती दिली आहे. (central government give big decision from 15th July 2022 till the next 75 days citizens 18 plus years of age will be given free booster doses)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 2 दिवसांनी म्हणजेच 15 जुलैपासून करण्यात येणार आहे. मात्र बूस्टर डोस 15 जुलैपासून पुढील 75 दिवसच मोफत देण्यात येणार आहे. 


भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 'आजादी का अमृत महोत्सव' हा उपक्रम देशातील सर्वत्र राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामांन्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे.


देशातील बहुतेक नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र बुस्टर डोस घेण्याकडे निष्काळजीपणा दाखवला जात आहे. अशा परिस्थितीत लोकांमध्ये जागरूकता वाढावी आणि त्यांनी बूस्टर डोस घ्यावा, यासाठी सरकारने 75 दिवस मोफत बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सरकारने बूस्टर डोसमधील कालावधी कमी केला होता. आधी दोन डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनंतरच बूस्टर डोस दिला जात होता. मात्र आता या कालावधीत 3 महिन्यांनी घट केल्याने आता बूस्टर डोस 6 महिन्यांनी देण्यात येत आहे.