वाहतूक पोलिसांना मूळ कागदपत्रे दाखविण्याची गरज नाही !
वाहतूक पोलिसांना तपासणीसाठी मूळ कागदपत्रे घेण्याची गरज नाही आता लागणार नाही.
नवी दिल्ली : वाहतूक पोलिसांना तपासणीसाठी मूळ कागदपत्रे घेण्याची गरज नाही आता लागणार नाही. केंद्र सरकारने तसे आदेशच सर्व राज्यांना दिलेत. तपासणीसाठी तुमच्या मोबाइलमध्ये असणाऱ्या कागदपत्रांची ई-कॉपीही पुरेशी असेल, असे सरकारी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे यापुढे आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीस आणि वाहतूक विभागाला तुमचा वाहतूक परवाना अथवा त्यासंबंधीची मूळ कागदपत्रे देणे बंधनकारक असणार नाही.
वाहतूक नियम मोडले किंवा वाहतूक सिग्नल तोडणे अथवा गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे अशा नियमांच्या उल्लंघनासाठी गाडी परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र आणि आणि विमा कागदपत्र या कागदपत्रांची मूळ प्रत जप्त करतात. अनेकदा पोलिंसांकडून ही कागदपत्रे गहाळ होतात. अशा स्थितीत नागरिकांनी तक्रार करुनही वाहतूक विभाग मूळ कागदपत्रे परत करु शकत नाही. त्यामुळे आता अशा कागदपत्रांची मूळ प्रत जमा करु नका, असे आदेश केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने सर्व राज्यांच्या वाहतूक विभागांना दिलेत.
ई-कॉपी पुरेशी
वाहतूक पोलिसांसाठी तपासणी करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसेन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र अथवा इन्शुरन्स पेपरच्या ई -प्रति वाहनचालक आपल्या मोबाईलवर डिजिटललॉकर अथवा एम-परिवहन अँप डाउनलोड करून मिळवू शकेल. या ई -प्रतीही वाहतूक पोलिसांना किंवा वाहतूक विभागाला दाखवल्या तरी चालणार आहे.