सरकारची अफलातून योजना, फक्त 1 रुपयाची गुंतवणूक आणि मिळणार 15 लाख
तुम्ही जर कमी गुंतवणूकीत चांगला नफा देणाऱ्या योजनेच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
मुंबई : तुम्ही जर कमी गुंतवणूकीत चांगला नफा देणाऱ्या योजनेच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने तुमच्यासाठी एक अफलातून योजना आणली आहे. या योजनेचं नाव सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) असं आहे. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करुन तुमच्या मुलाीचं भविष्य सुरक्षित करु शकता. इतकंच नाही, तर तुम्हाला यातून आयकरचीही बचत करु शकता. या योजनेनुसार तुम्ही दररोज केवळ 1 रुपयाची बचत करुनही फायदा मिळवू शकता. या योजनेबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. (central government scheme Sukanya Samriddhi Yojana know full details and process)
सुकन्या समृद्धी (Sukanya Samriddhi Yojana) ही केंद्र सरकारची अल्प बचत योजना आहे. ही योजना 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या योजनेअंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा व्याजदरहा फार चांगला आहे. अवघ्या 250 रुपयात तुम्ही योजनेसाठी खातं उघडू शकता. याचाच अर्था असा की तुम्ही दररोज 1 रुपयाची बचत केली, तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. कोणत्याही एका आर्थिक वर्षात किमान 250 जमा करावेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेच्या बँक खात्यात एका आर्थिक वर्षात एकदा किंवा अनेकदा 1 लाख 50 हजारांपेक्षा अधिक रक्कम जमा करता येत नाही.
व्याजदर किती?
यो योजनेत मिळणारा व्याजदर हा एकूण 7.6% इतका आहे. विशेष म्हणजू यातून कर सवलतही मिळते. याआधी या योजनेतून 9.2% इतका व्याज दरही देण्यात आला आहे. इतकच नाही, तर मुलीच्या वयाची 8 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी या योजनेतून एकूण रक्कमेच्या 50 रक्कम काढता येऊ शकते.
खातं कसं उघडायचं?
या योजनेनुसार तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खातं उघडू शकता. मुलीच्या जन्मानंतर ते 10 वर्षांपर्यंत किमान 250 रुपये गंतुवून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. हे खातं उघडल्यानंतर मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत किंवा 18 वर्षांनंतर जोवर लग्न होत नाही, तोवर यामध्ये गुंतवता येतात.