मुंबई : सणांचा सीझन सुरू झालाय... गणेशोत्सवानंतर दसरा, दिवाळी या सणांच्या मुहूर्तावर एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन यांसारख्या घरगुती वापराच्या वस्तू विकत घेण्याचा विचार करत असाल तर आपल्या खिशावर तुम्हाला थोडा ताण द्यावा लागेल. शिवाय, हवाई सफरदेखील महाग होऊ शकते. कारण, केंद्र सरकारनं 19 उत्पादनांच्या कस्टम ड्युटीमध्ये 10 टक्क्यांपर्यंत वाढ केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुपयाच्या घसरणीला ब्रेक लागावा या उद्देशानं केंद्र सरकार अनावश्यक आयातींवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत. त्या अंतर्गत मध्यरात्रीपासून टीव्ही, फ्रीज, वॉशिंगमशीन सारख्या घरगुती वापराच्या आयात होणाऱ्य़ा वस्तूवरील आयात शुल्क दुपट्टीनं वाढवण्यात आलंय. कालपर्यंत परदेशातून येणाऱ्या या इलेक्ट्रोनिक वस्तूवरील आयत शुल्क १० टक्के होतं. मध्यरात्री हे शुल्क वीस टक्के करण्यात आलंय.


गेल्या काही दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झालीय. त्यामुळे देशाच्या वित्तीय तूटीमध्ये कमालाची वाढ होतेय. त्यामुळे अनावश्यक गोष्टींच्या आयातीवर निर्बंध आणण्याचा निर्णय पंतप्रधानांनी दोन आठवड्यापूर्वी घेतलेल्या वित्त मंत्रालयाच्या बड्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्या निर्णयाला अनुसरूनच ही करवाढ करण्यात आली आहे.