Lekhpal did not recognize Smriti Irani: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि उत्तर प्रदेशमधल्या अमेठीच्या (Uttar Pradesh Amethi) खासदार स्मृती इराणी या भाजपच्या (BJP) दिग्गज नेत्या. आपल्या आक्रमक भूमिकेसाठी स्मृती इराणी ओळखल्या जातात. पण सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. एका गावात पाहणीसाठी गेलेल्या स्मृती इराणी यांच्याबरोबर एक अनपेक्षित गोष्ट घडली ज्याचा कदाचीत त्यांनाही अंदाज नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकं प्रकरण?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) अमेठीतल्या कादूनाला स्मारकावर शहीदांना पुष्पहार अर्पण करुन परतत होत्या. त्याचवेळी जवळच्या गौतमपूरमधल्या पहेलवाग गावातील एक रहिवासी आपल्या समस्यांचा अर्ज घेऊन स्मृती इराणी यांना भेटला. त्या व्यक्तीचे वडिल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते, त्यांचा मृत्यू झाला. पण लेखापालाकडून पडताळणी होत नसल्याने त्यांच्या आईला पेन्शन मिळत नव्हती. आपली व्यथा त्या व्यक्तीने स्मृती इराणी यांच्याजवळ मांडली.


कोण स्मृती इराणी?
त्या व्यक्तीची समस्या ऐकून स्मृती इराणी यांनी तात्काळ त्या लेखापालचा नंबर मागितला आणि उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांच्याशी आपलं बोलणं करुन देण्यास सांगितलं. अधिकाऱ्यांना त्या लेखापाला फोन केला. पण पहिल्यांदा लेखापालने फोन कट केला. अधिकाऱ्यांनी पुन्हा लेखापाला फोन केला. यावेळी लेखापाल दीपक कुमार यांनी फोन उचलला. अधिकाऱ्याने स्मृती इराणी यांना तुमच्याशी बोलायचं आहे असं सांगत फोन स्मृती इराणी यांच्याकडे दिला. पण लेखापालने चक्क स्मृती इराणी यांना ओळखण्यास नकार दिला. यानंतर स्मृती इराणी यांनी पुन्हा फोन अधिकाऱ्याकडे दिला. तर लेखानपालने त्या अधिकाऱ्यालाही ओळखण्यास नकार दिला.


एसडीएम सविता यादव यांच्याकडे याबाबत स्पषीकरण मागण्यात आलं. तेव्हा त्यांनी लेखापाल दीपक कुमार यांना कमी ऐकू येत असल्याचं सांगितलं. पण या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली असं सविता यादव यांनी सांगितलं.


व्हायरल होतोय या घटनेचा Video
सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या फोनवर बोलताना दिसत आहेत. त्यांचं संभाषणही स्पष्ट ऐकू येतंय, यात त्या म्हणतायत हॅलो दीपक जपी, स्मृती इराणी बोलतेय. पण समोरुन फोन कट होतो. पुन्हा फोन लावला जातो. यानंतर त्यांनी पुन्हा आपण स्मृती इराणी बोलत असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी अमेठीच्या खासदार बोलत असल्याचंही सांगितलं. पण यानंतरही दीपक कुमार यांनी ओळखण्यास नकार दिला. 



या प्रकरणी अधिकारी विकास कुमार यांनी लेखापाल दीपक कुमार यांना भेटण्यास सांगितल्याचं वृत्त आहे.