नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आता जे. पी. नड्डा असणार आहेत. अमित शाह यांच्यानंतर अध्यक्षपदी येणाऱ्या नड्डांसमोर काय आव्हानं असतील. भाजपमध्ये खांदेपालट झालं आहे. आता भाजपच्या पुढच्या जय-पराजयाची जबाबदारी नड्डांची म्हणत, अमित शाह पक्षाध्यक्षाच्या जबाबदारीतून मुक्त झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हापासून अमित शाह गृहमंत्री झालेत, तेव्हापासून भाजपचा महाराष्ट्र, झारखंडमध्ये पराभव झाला, तर हरियाणात कशीबशी सत्ता आली. 


आता थोड्याच काळात दिल्ली, बिहार आणि नंतर कोलकात्याची परीक्षा आहे. भाजपकडून या परीक्षेला जे. पी. नड्डा सामोरे जातील. पक्षाच्या निर्णयातून अमित शाहांनी स्वतःला बाजूला केलं आहे. 


गृहमंत्री म्हणून अमित शाहांना आता जास्त लक्ष देता येणार आहे. आतापर्यंत सर्वाधिक यशस्वी पक्षाध्यक्ष म्हणून अमित शाह यांचंच नाव घेतलं जाईल. 


जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून राजकारणात आलेले जे. पी नड्डा कायद्याचे पदवीधर आहेत. ते अभाविपचे सरचिटणीसही होते. आता अमित शाहांसारख्या दिग्गज नेत्याचे उत्तराधिकारी आहेत. 


अमित शाह यांच्यासारखंच यश त्यांना मिळेल का. याची उत्सुकता आहे..अर्थात नड्डांवर कंट्रोल कुणाचा असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.