नवी दिल्ली : संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाने त्रस्त आहे. त्यातच पंजाबमध्ये अडचणी आणखी वाढू शकतात. पंजाबमध्ये केवळ 2877 लोकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. खुद्द मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा असा विश्वास आहे की ही आकडेवारी फारच कमी आहे. केवळ तीन ठिकाणीच चाचणी घेण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर आणखी तीन जागांसाठी परवानगी घेण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी सीएम कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं की, 'की, आम्ही केवळ शेतकर्‍यांना लॉकडाऊनमध्ये सवलत देऊ, कारण यावेळी चांगले पीक आले आहे. कोरोनाची आकडेवारी भयानक आहे. ही गोष्ट चांगली नाही आणि लोकांना सुरक्षित ठेवणे आमचे कर्तव्य आहे. लॉकडाऊनबाबत आम्ही काय करणार आहोत हे दुपारी कॅबिनेटमध्ये ठरवू. आत्ता लॉकडाउन काढणे योग्य नाही.'


मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटलं की, जगभरातून 95,000 लोक अमृतसर आणि इतर ठिकाणी परत आले आहेत. त्यांना नियंत्रित ठेवणे हे आमचे मुख्य ऑपरेशन बनले आहे. ते नियंत्रणात आहे. निजामुद्दीनचा मुद्दाही पुढे आला. निजामुद्दीनहून परतलेले 533 लोकांना वेगळं ठेवण्यात आलं आहे.


मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटलं की, आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची काळजी कशी घ्यावी यासाठी सुविधा देत आहोत. त्यांनी सांगितले की पंजाबमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशनची 27 प्रकरणे आहेत, जी परदेशात गेलेली नाहीत. 2,032 लोकांना वेगळं ठेवण्यात आले आहे. 61,831 लोकांचा प्रवास इतिहास आहे.