Trending News :  आई-वडिलांनंतर आपला गुरु म्हणजे शिक्षक. शिक्षक कितीही रागवला तरी आपण त्यांचा आदर ठेवतो. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर आपण डोळेझाकून विश्वास ठेवतो. काही शिक्षकांच्या कृत्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याला काळीमा फासली जाते. पण काही शिक्षक इतके छान असतात की त्यांचाबद्दल कितीही बोलं तरी शब्द कमी पडतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेतील सगळेच शिक्षक मुलांना आवडतात असं नाही. विद्यार्थी काही शिक्षकांना टोपण नाव देखील ठेवतात. तुम्ही पण ठेवली असतील ना अशी टोपण नावं. शाळेत असं खूप कमी शिक्षक असतात जे सर्व विद्यार्थ्यांना आवडतात. जर अशा शिक्षकाचा शाळेचा शेवटचा दिवस असेल तर मग काय होईल.


असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील प्रेमाचा क्षण या व्हिडीओत पाहिला मिळतो आहे. हा व्हिडीओ पाहून तो शिक्षक आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आई - वडिलांपेक्षा पण खास आहे हे जाणवतं. त्या शिक्षकांने प्रत्येक विद्यार्थ्यांवर किती जीव लावला असेल हे या व्हिडीओतून दिसून येतं आहे. हा क्षण पाहून तुमचे डोळेसुद्धा पाणवल्याशिवाय राहणार नाही. 


शिक्षकासाठी मुलं रडली ढसाढसा...



हो, या व्हिडीओमध्ये शिक्षकाला शाळेतून निरोप देताना विद्यार्थी ढसाढसा रडताना दिसत आहेत. या व्हिडीओला पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू येईल. उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील शाळेतील एका शिक्षकाची बदली झाली. या शिक्षकाने शाळेत 4 वर्ष विद्यार्थी घडवले. पण आता जेव्हा त्याच्यावर शाळा आणि विद्यार्थ्यांना सोडून जाण्याचा क्षण आला. तेव्हा विद्यार्थ्यांना आपल्या लाडक्या सरांना निरोप देणं कठीण गेलं. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. यावेळी विद्यार्थी सरांना मिठी मारुन ढसाढसा रडू लागली. हे विद्यार्थी इतकी रडतं होती की जसं की या शिक्षकाला परत कधी बघूच शकणार नाहीत. तुम्ही कधी पाहिल का कुठल्या शिक्षकासाठी असं प्रेम?


''...बस आता तुम्ही चांगला अभ्यास करा''



या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, विद्यार्थी भावूक होऊन खूप रडत आहेत. पण या भावूक क्षणीसुद्धा शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला. शिक्षक सतत एकच वाक्य म्हणत होता, ''तुम्ही सगळे चांगला अभ्यास करा, मी तुम्हाला लवकरत परत भेटायला येईल.''


काय आहे 'या' प्रेमळ शिक्षकाचं नाव?



शिवेंद्र सिंह बघेल असं या शिक्षकांचं नाव आहे. या शिक्षकाचा शाळेत 7 सप्टेंबर 2018 ते 12 जुलै 2022 पर्यंत कार्यकाळ होता. त्यामुळे त्याची दुसऱ्या शाळेत बदली झाली. या शाळेत असताना त्याचा बोलण्यातून, शिकवण्यातून त्याने विद्यार्थ्यांची मनं जिंकली होती. त्यामुळे शाळेचा शेवटचा दिवस या शिक्षकांसाठी खूप भावूक राहिला.