Punjab-Haryana High Court : पती आणि पत्नीमध्ये या ना त्या कारणाने भांडण होणं, हे काही नवीन नाही. पण यातून कोणी टोकाचं पाऊल उचललं तर... अशीच काहीशी घटना समोर आली आहे. एका जोडप्यात दररोज भांडणं होत होती. पत्नी शिकलेली होती तर पती अशिक्षित. त्यामुळे पत्नी आपल्या पतीला सातत्याने कमी लेखत होती. यावरुन दोघांमध्ये भांडणं व्हायची. अनेकवेळा पत्नी रागावून माहेरी निघून जायची. पण नातं तुटू नये यासाठी सासरचे तीला समजूत घालून पुन्हा आणायचे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबमधल्या बरनालाती ही घटना आहे. 28 जून 2015 ला पती आणि पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. पत्नीने पतीच्या कानाखाली थप्पड मारली. भांडणात पत्नीला पतीला 'जा जाऊन मर कुठे तरी' असं सुनावलं. हा अपमान पतीच्या जिव्हारी लागला. त्याने आपल्या खोलीत जात दरवाजा बंद करुन घेतला आणि स्वत:ला पेटवून घेतलं. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


याप्रकरणी सासरच्या लोकांनी तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. जिल्हा न्यायालयाने त्या महिलेला आरोपी घोषित करत 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 1.25 लाख रुपयांचा दंड ठोठावला. पण जिल्ह्या न्यायालयाने दिलेल्या या निकालाविरोधात आरोपी महिलेने उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने महिलेची याचिका मंजूर करत महिलेची निर्दोष सुटका केली. 


जा जाऊन मर असं जर ती महिला आपल्या पत्नीला म्हणाली असेल तर ते वक्तव्य आत्महत्येस प्रवृत्त करणारं होऊ शकत नाही, तसंच असं वक्तव्य करणं म्हणजे गुन्हा नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं. याच आधारावर उच्च न्यायालयाने त्या महिलेची शिक्षा रद्द करत तिची निर्दोष मुक्तता केली.