चंदीगढ : अतिशय धक्कादायक प्रकार चंदीगढमध्ये घडला आहे. सगळीकडे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असताना या उत्साहाला गालबोट लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळेतून स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आटोपून येणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार घडल्याला प्रकार समोर आला आहे. ही मुलगी ८ वी मध्ये शिकत होती आणि शाळेत सकाळी ७१ व्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करून ती घरी परतत असताना हा प्रकार घडला आहे. चंदीगढमध्ये मध्यरात्री आयएएसच्या मुलीसोबत छेडछाडीचं प्रकरण अद्याप शांत झालेलं नसताना हा प्रकार घडल्यामुळे चंदीगढमध्ये मुली सुरक्षित नसल्याची बाब समोर आली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सेक्टर २३ मध्ये असलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कजवळ असलेल्या नाल्याजवळ ही घटना घडली. या घटनेतील आरोपी ४० वर्षाचा असून हा प्रकार ज्या ठिकाणी घडला ती जागा अतिशय शांत आणि जंगलजवळ असल्याचं कळलं आहे. 



पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना आज १५ ऑगस्ट रोजी मंगळवारी ११ वाजता घडली आहे. या पीडित मुलीने शाळेतून घरी जाण्यासाठी शॉर्टकट रस्त्याचा वापर केला. आणि पीडित मुलीचं वय ११ वर्षे इतकं आहे. पोलिसांनी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सॅक्युअल (पॉस्को) अॅक्ट आणि सेक्टर १७ पोलिस ठाण्यात ही घटना नोंदवली आहे. पीडित मुलीचे कुटुंबिय सेक्टर २४ मध्ये राहतात. कुटुंबाने लगेच १०० क्रमांकाच नंबर डायल करून पोलिसांत तक्रार नोंदवली.