रात्री धोका असेल तर मुलांना घरातच ठेवा - किरण खेर
चंदीगडमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीसोबत झालेल्या छेडछाडीनंतर देशभरात संताप व्यक्त केला गेला. यादरम्यान चंदीगडहून भाजपच्या खासदार किरण खेर यांनीही यावर भाष्य केलंय.
नवी दिल्ली : चंदीगडमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीसोबत झालेल्या छेडछाडीनंतर देशभरात संताप व्यक्त केला गेला. यादरम्यान चंदीगडहून भाजपच्या खासदार किरण खेर यांनीही यावर भाष्य केलंय.
जेव्हा गोष्ट सुरक्षेची असते तेव्हा मुलांसाठी आणि मुलींसाठी नियम सारखेच असायला हवेत... नियम आणि निर्बंध सारखेच असायला हवेत... समस्या निर्माण होत असतील तर रात्री मुलांनाही घराच्या बाहेर पडू देता काम नये... रात्री धोका का आहे? आणि दिवसा का नाही?
हरियाणाचे भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला आणि त्याचा साथीदार आशीष कुमार यांच्यावर चंदीगडमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. गुरुवारी त्यांना अटक करण्यात आलीय.
उल्लेखनीय म्हणजे, महिलेची छेडछाड करण्याच्या आरोप विकास आणि त्याच्या मित्राला दुसऱ्यांदा अटक करण्यात आलीय. यापूर्वी महिलेच्या तक्रारीनंतर शनिवारी दोघांना अटक करण्यात आली होती परंतु, त्यांना जामिनावर सोडण्यात आलं. तेव्हा त्यांच्यावर साधारण कलमं लावण्यात आली होती. यावर देशभरात सोशल मीडियातून तीव्र टीका करण्यात आली. दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींची चौकशी करून पुरावे मिळाल्याचा दावा करत दोघांविरुद्ध कलम ३६५ आणि ५११ अंतर्गत अपहरणाचा प्रयत्न आणि अजामीनपात्र आरोप लावले.