Karnataka Elections 2023 : भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये चंद्रकांत पाटील यांना गुलबर्गा उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या पहिल्या यादीत 189 उमेदवारांची घोषणा केली होती. कर्नाटकात 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होत आहे आणि मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपने आपली उमेदवार यादी जाहीर केल्यापासून राज्यात पक्षात गोंधळाचे वातावरण आहे. 11 एप्रिल रोजी, भाजपने 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ज्यात 52 नवीन चेहरे आणि 8 महिला आहेत. 12 एप्रिल रोजी 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या भाजपच्या उमेदवारी  यादीत हुबळी-धारवाड मध्यचा समावेश नाही. ज्या विभागातून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना डावल्याने त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तसेच विद्यमान आमदार आणि माजी मंत्री केएस ईश्वरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. तर या यादीत चार अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती आणि दोन महिला उमेदवारांचा समावेश होता.



(फोटो - एएनआय)


चन्नागिरीचे आमदार विरुपक्षप्पा, ज्यांना नुकतेच लोकायुक्त पोलिसांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली होती, ते विद्यमान आमदारांमध्ये होते. ज्यांचा या यादीत समावेश नव्हता. शिवकुमार यांना चन्नागिरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. हावेरीमध्ये विद्यमान आमदार नेहरु ओळेकर यांच्या जागी गविसिद्धप्पा दयमन्नावार यांना संधी देण्यात आली आहे. तिकीट नाकारल्यानंतर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींना पक्षाचा त्याग केलााय. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, कर्नाटकचे सहा टर्म आमदार आणि मत्स्यव्यवसाय मंत्री एस अंगारा, मुदिगेरे, चिक्कमगलुरू जिल्ह्यातील भाजप आमदार, नेहरु ओलेकर, आर शंकर आणि गुलीहट्टी शेखर यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे.  


पक्षाने आतापर्यंत एकूण 224 जागांपैकी 212 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. 12 उमेदवारांची तिसरी यादी अद्याप जाहीर झालेली नाही.