भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी 4 जण अटकेत, `या` लोकांनी केला होता गोळीबार
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर 28 जूनला सहारनपूरमधल्या देवबंद इथं जीवघेणा हल्ला झाला होता. काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला, यात चंद्रशेखर आझाद जखमी झाले होते. याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे.
Chandrashekhar Azad Attack : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अंबालामधून (Ambala) या चार हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. हल्लेखोर अंबाला कोर्टात शरणागती पत्करण्याच्या तयारीत होते, अशी माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या चार जणांपैकी तीनजण देवबंदमधल्या ग्राम रणखंडी इथले राहाणारे आहेत. यातल्या एका आरोपीने जेलरवरही हल्ला केला होता. या प्रकरणात 15 दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता.
चंद्रशेखर आझाद यांच्यावर हल्ला
भीम आर्मी (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर आझाद हे गोळीबारात जखमी झाले होते. त्यांना रुग्णालायत दाखलक करण्यात आलं होतं. 29 जूनला त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं. 28 जूनला त्यांच्या कारवर काही अज्ञात लोकांनी गोळीबार (Firing) केला. एकूण चार राऊंड फायर करण्यात आले होते. यात एक गोळी चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) च्या कमरेला चाटून गेली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ पोलीस बंदोबस्तात वाढ करत तपास सुर केला. तपासात पोलिसांनी आरोपींची कार जप्त केली होती. आज आरोपींनाही अटक करण्यात आलं आहे.
चंद्रशेखर आझाद हे दिल्लीवरून उत्तर प्रदेशमध्ये परतत होते. सहारनपूरमधल्या देवबंद इथं त्यांच्या कारवर अचानक काही लोकांनी गोळीबार केला. आरोपींनी 20 सेकंदात चार गोळ्या झाडल्या. यात कारच्या काचा फुटल्या. हल्लेखोरांच्या गाडीने आधी चंद्रशेखर आझाद यांच्या कारचा पाठला केल्या. त्यानंतर 5 ते 10 मीटर अंतरावर असताना कारमधून एक व्यक्ती बाहेर आला आणि त्याने चंद्रशेखर आझद यांच्या कारवर गोळीबार केला.
आपल्या कारचा चालक मनीषने प्रसंगावधान दाखवत कार पुढे नेली आणि यूटर्न घेतला. पण मी जिंवत असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी पुन्हा गोळीबार केला. चालक मनीषने गावात जाऊन कार थांबवली आणि पोलिसांना फोन केला. मला एक गोळी लागली होती, त्यामुळे त्याने मला रुग्णालयात दाखल केलं.
कोण आहेत हल्लेखोर?
ज्या ठिकाणाहून हल्लेखोरांची कार जप्त करण्यात आली हे ते गुर्जर समाजाचा गाव आहे. काही जणांकडून दलित आणि गुर्जर समाजात भांडण लावू इच्छितात असा आरोप चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मी शांततेचं आव्हान केलं नसतं तर आज परिस्थिती वेगळ असती असं चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलं.