कोलकाता: देशातील आर्थिक संकटाच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच चांद्रयान-२ मोहीमेचा गाजावाजा केला जात असल्याचा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. त्या शुक्रवारी पश्चिम बंगालच्या विधानसभेत राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) कायद्याविरोधात मांडण्यात आलेल्या विधेयकावरील चर्चेत बोलत होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, देशात पहिल्यांदाच चंद्रयान मोहीम पार पडत आहे का? भाजप सत्तेत येण्यापूर्वी अशी कोणतीच मोहीम झाली नव्हती का?, असा उपरोधिक सवाल ममता बॅनर्जी यांनी विचारला. देशातील आर्थिक संकटाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच चांद्रयान-२ मोहीमेचा गाजावाजा केला जात असल्याचा आरोपही यावेळी ममतांनी केला. 


Chandrayaan-2:... तर मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरून तुमचा फोटो होणार रिट्विट


चांद्रयान-२ मोहीम यशस्वी ठरल्यास भारत हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा देश ठरेल. 


श्रीहरीकोटा येथून २२ जुलैला झेपावलेले चांद्रयान-२ चे लँडर विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास चांद्रयान-२ चे लँडर विक्रम सुरक्षित उतरण्यासाठी आगेकूच करेल. हा या मोहीमेतील अखेरचा आणि महत्त्वाचा टप्पा असेल. संपूर्ण जगाचे या मोहिमेकडे लक्ष लागले आहे.


चांद्रयान-२ : मध्यरात्रीनंतर घडविणार इतिहास, चंद्रावर उतणार लँडर 'विक्रम'