श्रीहरिकोटा : तांत्रिक बिघाडामुळे इस्त्रोने चांद्रयान-२ चे उड्डाण रद्द केले होते. काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आलेली चांद्रयान-२ प्रक्षेपण मोहीम आता २२ जुलै रोजी सुरु करण्यात येणार आहे. चांद्रयान-२ हे आता आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून अवकाशात झेपावणार आहे, अशी माहीती इस्त्रोच्या अधिकृत ट्विटवर माहिती देण्यात आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ ची मोहीम आयत्यावेळी थांबवण्यात आली.  सोमवारी १५ जुलैला मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचे हे यान अवकाशात झेपावणार होते. उड्डाण घेण्यासाठी ५६ मिनिटे बाकी असताना इस्रोने तांत्रिक अडचणीमुळे ही मोहीम थांबवण्याची घोषणा केली. 


तांत्रिक बिघाडामुळे इस्त्रोला चांद्रयान-२ चे उड्डाण रद्द करावे लागले होते. चांद्रयान-२ चे उड्डाणाच्यावेळी बिघाड लक्षात आल्याने ते रद्द करण्यात आले होते.  चांद्रयान-२ च्या  क्रायोजेनिक इंजिनमधील हेलियम गॅस बॉटलच्या जॉईंटमध्ये गळती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ५६ मिनिटे बाकी असताना उड्डाण रद्द करण्यात आले. आता २२ जुलै रोजी दुपारी २ वाजून५३ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार आहे, अशी माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे.  




#Chandrayaan2  छाया सौजन्य - ISRO