मुंबई : 'चांद्रयान 2' Chandrayaan च्या प्रक्षेपणानंतर जवळपास 3 महिन्यानंतर विक्रम लँडरचे Vikram Lander अवशेष  सापडले आहेत. हे अवशेष शोधण्यात चेन्नईच्या इंजीनिअरची सर्वात महत्वाची भूमिका आहे. शनमुग सुब्रमण्यमने (Shanmuga Subramanian) (Shan)  नासाच्या NASA फोटोंचा वापर करून विक्रम लँडरचे अवशेष शोधून काढले. चंद्राशी धडकल्यानंतर विक्रम लँडरशी इस्त्रोचा ISRO संपर्क तुटला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनमुग सुब्रमण्यम एक मॅकेनिकल इंजीनिअर आणि कॉम्प्युटर प्रोग्रामर आहे. ज्याने लेनोक्स इंडिया टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये देखील काम केलं आहे. मदुरईमध्ये राहणारा शनमुग कॉग्निजेंटमध्ये प्रोग्राम ऍनालिस्ट म्हणून कार्यरत होता. शनमुगने नासाच्या मून लूनर रिकॉनेसेंस ऑर्बिटरद्वारे 17 सप्टेंबर, 14,15 ऑक्टोबर आणि 11 नोव्हेंबरमध्ये काढण्यात आलेल्या फोटोंच्या माध्यमातून याचा अभ्यास केला आहे. आणि या अवशेषांना शोधून काढलं आहे. (Chandrayaan2 : NASAला सापडले विक्रम लँडरचे अवशेष) 



अवशेष सापडल्यानंतर शनमुगने यासंदर्भातील माहिती नासाला दिली. नासाने यावर अभ्यास करण्यासाठी काही वेळ घेतला. त्यानंतर अवशेषांचा शोध लागल्याचे सांगितले. नासाचे डिप्युटी प्रोजेक्ट संशोधक जॉन केलरने शनमुगला आभारपर पत्र लिहून ईमेल केले. 


माहिती मिळाल्यानंतर नासाने सगळीकडे शोध केला. त्यानंतर फोटोच्या आधारे नासा आमि एएसयुच्या सोशल मीडिया पेजवर शनमुगला त्याचा कामाचे श्रेय दिले. चंद्रावरील विक्रम लँडरचे अवशेष आणि त्यामुळे उमटलेले परिणाम यांचे फोटो NASAकडून सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयीची माहिती देण्यात आली. ७ सप्टेंबरला लँड होण्याआधी काही क्षणांपूर्वीच विक्रम लँडरचा इस्त्रोशी त्याचा संपर्क तुटला होता. 



असे शोधले विक्रम लँडरचे अवशेष 


दररोज 7 ते 8 तास मी या कामासाठी देत असे. चार ते पाच दिवस असं काम करण्यात आलं. ही सुरूवात त्याने सात सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली. लँडिंग साइटच्या जवळपास साडे सातशे मीटरवर एक सफेद बिंदू दिसला. लँडिंगच्या अगोदरच्या फोटोत हा बिंदू दिसत नव्हता. तसेच त्याचे चमक देखील जास्त होते. तेव्हा शनमुगला अंदाज आला की, हा विक्रम लँडरचाच तुकडा आहे. तेव्हा मी ट्विट केलं की, बहुतेक याच जागेवर विक्रम लँडरची चंद्राशी टक्कर झाल्यानंतर मातीमध्ये लपला गेला.