बंगळुरु : मिशन चांद्रयान- २ मोहिमेची तारीख घोषित करण्यात आली आहे. १५ जुलैला पहाटे २.५१ मिनिटांनी चांद्रयान- २ अवकाशात झेपावणार आहेत. इस्रोचे संचालक के. सिवन यांनी ही घोषणा केली. दरम्यान, इस्रोची महत्वाकांक्षी चांद्रयान- २ मोहिमेची चाचणी अखेरच्या टप्प्यात आली असून, तामिळनाडूच्या महेंद्रगिरी आणि बंगळूरूच्या ब्यालालू येथे ही चाचणी सुरु आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मिशन चांद्रयान या मोहिमेशी संबंधित माहिती देणारी एक संकेतस्थळीही आज लॉन्च करण्यात आले. 'चांद्रयान-१'च्या धर्तीवरच ही संपूर्ण मोहीम असणार आहे. मात्र, चंद्रावर उतरण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. प्रेक्षपणासह या संपूर्ण मोहिमेवर ९७८ कोटी रुपये खर्च होतील, असे सिवन यांनी सांगितले. 


चांद्रयान- २ बद्दल




'चांद्रयान- २'चे लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. यानाचे एकूण वजन ३८०० किलो आहे. यापैकी रोव्हरचे वजन २७ किलो आणि लांबी १ मीटर आहे. लँडरचं वजन १४०० किलो आणि लांबी ३.५ मीटर आहे. तसेच ऑर्बिटरचं वजन २४०० किलो आणि लांबी २.५ मीटर आहे.