विक्रम लँडरची सॉफ्ट लँडिंग कशी झाली? ISRO शेअर केला Video, पाहा शेवटच्या 137 सेकंदाचा थरार!
Vikram lander landing Video : इस्त्रोकडून नवा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये लँडर विक्रम कशाप्रकारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला हे पहायला मिळत आहे.
Vikram lander Prior to touchdown Video: गेली 6 वर्ष भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) ज्यासाठी मेहनत घेत होती. त्या कष्टाचं सोनं झाल्याचं पहायला मिळत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. त्यामुळे आता जगभर नाव गाजतंय तर ते भारताचं. 23 ऑगस्टच्या संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. पंतप्रधान मोदींसह संपूर्ण देशवासियांनी ऐतिहासिक क्षण आपल्या डोळ्यांनी पाहिला. अशातच आता इस्त्रोने नवा व्हिडीओ (Vikram lander landing Video) शेअर केला आहे.
विक्रम लँडर चंद्रावर सुरक्षितपणे लँड झाला आणि भारतीयांनो, मी पोहोचलोय आणि तुम्ही सुद्धा असा मॅसेज पाठवला. त्यानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण होतं. त्यानंतर आता चांद्रयान 3 लँडर आणि बंगळुरुतील मॉक्स इस्ट्रॅकमध्ये संपर्क प्रस्थापित झाल्याची माहिती इस्त्रोकडून देण्यात आली होती. अशातच आता इस्त्रोकडून नवा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये लँडर विक्रम कशाप्रकारे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरला हे पहायला मिळत आहे.
आणखी वाचा - Chandrayaan-3: चंद्रावर रोव्हर उतरत असतानाचा पहिला फोटो समोर!
विक्रम लँडरला (Vikram lander) विविध कॅमेरे लावण्यात आले होते. लँडरच्या इमेजर कॅमेर्याने टचडाउनची म्हणजे चंद्रावर उतरण्याचा क्षण कॅमेऱ्यात कैद केला आहे. या कॅमेऱ्याने कशाप्रकारे चंद्राची प्रतिमा आणि व्हि़डीओ कैद केलाय. त्याचं झलक पहायला मिळत आहे. त्याचा हा 137 सेकंदाचा व्हिडीओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
पाहा Video
दरम्यान, चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंग केल्यानंतर आता विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर आला आहे. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील माहिती इस्रोला पाठवणार आहे. ही मोहीम 14 दिवसांसाठी चालणार आहे. प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरला जी माहिती पाठवेल ती विक्रम लँडर पृथ्वीवर पाठवणार आहे. ज्यावेळी चंद्राचा भाग प्रकाशात असेल तेव्हाच या 14 दिवसांच्या कालावधीत प्रज्ञान रोव्हर काम करेल.