चांद्रयान 3 च्या लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हरला जेव्हा डिअॅक्टिव्ह करण्यात आलं होतं, तेव्हा त्यातील काही सर्किट हे जागे म्हणजेच अॅक्टिव्ह ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. जेणेकरुन इस्रो 22 सप्टेंबरला जो संदेश पाठवणार आहे, तो रिसीव्ह केला जाईल. दरम्यान, इस्रो सतत चांद्रयान 3 शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. पण प्रज्ञानकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळत नाही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण चिंतीत होण्याचं काही कारण नाही. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमध्ये एक अनोखं तंत्रज्ञान बसवण्यात आलं आहे. यामुळे जेव्हा त्याला सूर्याच्या प्रकाशातून पूर्पणणे ऊर्जा मिळेल तेव्हा ते आपोआप जागं होईल. म्हणजेच ते ऑटोमॅटिकली अॅक्टिव्ह होतील. आपल्याला फक्त त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. आपल्याकडे अद्यापही 13 ते 14 दिवस बाकी आहेत. 


'जोपर्यंत जाग येणार नाही, तोपर्यंत प्रयत्न सुरु राहतील'


पुढील 13 ते 14 दिवसांत कधीही विक्रम आणि प्रज्ञान यांच्यासंबंधी आनंदाची बातमी येऊ शकते. सूर्यास्त होण्यापूर्वी म्हणजेच शिवशक्ती पॉईंटवर पुन्हा एकदा अंधार होण्यापूर्वी ही बातमी येऊ शकते. याआधी 22 सप्टेंबर 2023 रोजी अहमदाबाद येथील इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक निलेश देसाई यांनी सांगितलं होतं की, इस्रो चांद्रयान 3 म्हणजेच लँडर-रोव्हरला 23 सप्टेंबरला जागं करण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या लँडर आणि रोव्हर हे पूर्णपणे निष्क्रिय आहेत. पण जोपर्यंत आम्हाला काही प्रतिक्रिया मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न सुरु राहणार आहेत. 


चंद्रावर सकाळ झाली आहे. प्रकाशही पूर्णपणे मिळत आहे. पण चांद्रयान 3 च्या लँडर आणि रोव्हरला अद्याप अपेक्षित ऊर्जा मिळालेली नाही. दरम्यान आतापर्यंत चांद्रयान 3 मुळे अनेक नवी माहिती हाती लागली आहे. वैज्ञानिक या सर्व माहितीचा अभ्यास करत आहेत. गेल्या दहा दिवसांतील सर्व डेटा पडताळला जात आहे. यादरम्यान प्रज्ञान रोव्हरने 150 मीटरपर्यंत हालचाल केली आहे. 


प्रज्ञान रोव्हरमधून मिळालेल्या डेटाचाही अभ्यास केला जात आहे. चंद्रावरील जमिनीचं विश्लेषण केलं जात आहे. जेणेकरुन पाण्याची स्थिती, मानवी जीवनाची शक्यता याची माहिती मिळावी. 14 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावरुन वेगवेगळी माहिती पाठवल्यानंतर चांद्रयान 3 स्लीप मोडवर गेलं होतं. त्यावेळी चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर तापमान उणे 120 ते 220 डिग्री सेल्सिअस होतं. यामुळे यंत्रांमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. 


या तापमानाचा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवर किती परिणाम झाला याची माहिती चांद्रयान 3 पुन्हा जागं झाल्यानंतरच समजू शकणार आहे. याआधी आज अलसुबह यूरोपियन स्पेस एजेंसी (ESA) च्या कोरोऊ स्पेस स्टेशनमधून चांद्रयान 3 च्या लँडर विक्रमला सतत मेसेज पाठवले जात होते. पण लँडरकडून अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही आहे. म्हणजेच अद्यापही रेडिओ फ्रिक्वेन्सी हवी तितकी मजबूत नाही.