अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : भारताच्या महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण तांत्रिक अडचणींमुळे थांबवण्यात आलं. सोमवारी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. उड्डाण घेण्यासाठी ५६ मिनिटं बाकी असताना इस्रोनं तांत्रिक अडचणीमुळे ही मोहिम थांबवण्याची घोषणा केली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उड्डाणानंतर ५२ दिवसांनी ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोहोचणार होतं. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच जाहीर करणार आहे.



आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं. इस्त्रोच्या अधिकृत ट्विटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.