Sim Card Rule : सरकारचा सिम कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल
Sim Card Rule : काही ग्राहकांना आता नवीन सिम मिळणार नाही.
New Telecom Reforms: नवीन सिम (Sim Card) घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. सरकारने (Government) सिम कार्डबाबत नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार काही ग्राहकांना नवीन सिम घेणं सोपं झालंय. मात्र काही ग्राहकांना आता नवीन सिम मिळणार नाही. नवीन नियमानुसार, ग्राहक आता नवीन सिमसाठी ऑनलाइन अर्ज करतील. त्यानुसार सिमकार्ड त्यांच्या घरी पोहोचेल, अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. (changes in rules for sim now company cannot sell new sim to customers below 18 years of age)
सिम कार्डसाठी बदलेले नियम
सरकारने सिमचे नियम बदलले आहेत. आता नवीन नियमांनुसार, कंपनी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांना नवीन सिम विकू शकत नाही.
18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ग्राहक त्यांच्या नवीन सिमसाठी आधार किंवा डिजीलॉकरमध्ये असलेल्या कोणत्याही दस्तऐवजासह पडताळणी करू शकतात.
Dot चे हे पाऊल 15 सप्टेंबर 2021 रोजी कॅबिनेटने मंजूर केलेल्या दूरसंचार सुधारणांचा एक भाग आहे.
आता नवीन मोबाइल कनेक्शनसाठी (New Mobile Connection) वापरकर्त्यांना UIDAI च्या आधार आधारित ई-केवायसी सेवेद्वारे प्रमाणपत्रासाठी फक्त 1 रुपया द्यावा लागेल.
कोणाला सिम मिळणार नाही?
दूरसंचार विभागाच्या नवीन नियमांनुसार, आता कंपनी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या वापरकर्त्यांना सिम कार्ड मिळणार नाही.
जर एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आजारी असेल तर अशा व्यक्तीला नवीन सिमकार्डही दिले जाणार नाही.
जर अशी व्यक्ती नियमांचे उल्लंघन करताना पकडली गेली, तर ज्या टेलिकॉम कंपनीने सिम विकले आहे ती दोषी मानली जाईल.
घर बसल्या मिळणार सिम कार्ड
नवीन नियमांनुसार, आता ग्राहकांना UIDAI आधारित पडताळणीद्वारे त्यांच्या घरी सिम मिळेल. मोबाईल कनेक्शन ग्राहकांना अॅप/पोर्टल आधारित प्रक्रियेद्वारे दिले जाते. ज्यामध्ये ग्राहक घरी बसून मोबाईल कनेक्शनसाठी अर्ज करू शकतात. यापूर्वी ग्राहकांना मोबाइल कनेक्शनसाठी किंवा प्रीपेड ते पोस्टपेड मिळविण्यासाठी केवायसी प्रक्रियेतून जावं लागायचं.