लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारकडून रविवारी मुगलसराय या रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्यात आले. यापुढे मुगलसराय स्थानक पंडित दिनदयाळ उपाध्याय या नावाने ओळखले जाईल. मात्र, यावरुन भाजपच्याच एका आमदाराने पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुगलसराय स्थानकाचे नाव पंडित दिनदयाळ उपाध्याय केल्याने ट्रेन वेळेवर येणार नाहीत. याऐवजी रेल्वेने आपल्या कारभारातील त्रुटी दूर केल्या पाहिजेत. केवळ रेल्वे स्थानकांची नावं बदलून विकास होणार नाही, असे योगी सरकारमधील मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी सांगितले. 


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत मुगलसराय स्थानकाच्या नामांतराचा सोहळा पार पडला. १९६८ साली पं. दिनदयाळ उपाध्याय या स्थानकाच्या परिसरात मृतावस्थेत आढळून आले होते.