कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेत सोमवारी आमदारांमध्ये राडा झाला. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेस (TMC) आणि विरोधक भाजपचे आमदार एकमेकांना भिडले. टीएमसीचे आमदार असित मजूमदार आणि भाजपे आमदार मनोज तिग्गा हे एकमेकांवर धावून गेले. या प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष यांनी विरोधीपक्ष नेते शुभेंदु अधिकारी यांच्यासह भाजपच्या 5 आमदारांना निलंबित केले आहे. (5 BJP MLAs suspended after chaos in Bengal Assembly)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशावरुन झाला वाद


पश्चिम बंगाल विधानसभेत (Bengal Assembly) आज सकाळी विरोधकांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta Banerjee) यांच्याकडून उत्तर मागितलं. त्यानंतर टीएमसी आमदार (TMC MLA) भडकले. दोन्ही बाजुंनी एकमेकांवर टीका सुरु झाली. बघता बघता बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झालं. 


भाजप आमदारांनी आरोप केलाय की, ते बीरभूम हत्या प्रकरणात चर्चेची मागणी करत होते. ज्यानंतर टीएमसी आमदारांनी गदारोळ सुरु केला. त्यानंतर मारहाण केली. भाजप आमदार शुभेंदु अधिकारी, मनोज तिग्गा, नराहरी महतो, शंकर घोष, दीपक बरमन यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर भाजपच्या 25 आमदारांनी विधानसभेतून वॉकआऊट केलं. टीएमसीच्या आमदारांनी भाजपच्या आमदारांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.