Char Dham Yatra : तुम्ही जर चार धाम यात्रेसाठी जाणार असाल तर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यावर्षी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर (Akshaya Tritiya 2024) म्हणजे 10 मे 2024 पासून सुरु होणार आहे. आतापर्यंत या यात्रेसासाठी 16 लाखांहून अधिक भाविकांनी ऑनलाईन बुकिंग केली आहे. या यात्रेत कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात येते. या अनुषंगाने चार धाम यात्रेमध्ये एका दिवसात किती भाविक दर्शन घेऊ शकणार आहेत, याचा निर्णय घेण्यात आलाय. (Char Dham Yatra registration Only so many people can take Darshan badrinath gangotri yamunotri kedarnath dham in one day)


एका दिवसात किती भाविक दर्शन घेऊ शकणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशासनाने ठरवलेल्या नियमांनुसार एका दिवसात यमुनोत्री धामचं दर्शन केवळ 9 हजार भाविक घेऊन शकणार आहेत.



तर गंगोत्री धामसाठी 11 हजार भाविकांची मर्यादा असणार आहे. तर केदारनाथ धामसाठी 18 हजार आणि बद्रीनाथ धामसाठी 20 हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. त्याशिवाय ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय भाविकांना चार धामचं दर्शन घेता येणार नाही, सांगण्यात आलंय.