मुंबई : शेअर बाजार अशी जागा आहे की, जेथे आपण एका दिवसात लखपती होऊ शकतो. पैसे गुंतवणूक मोठा परतावा मिळवू शकतो. परंतू त्यासाठी योग्य शेअरची निवड करणे गरजेचे असते. योग्य शेअरची निवड केल्यास, तसेच त्या शेअरचे फंडामेंटल्स चांगले असले तर नक्कीच गुंतवणूकदारांना चांगला फायदा होऊ शकतो. शेअर बाजाराच्या चालीचा अभ्यासही त्यासाठी महत्वाचा ठरतो. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही एक्सपर्टचा सल्ला घेऊ शकता. मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी कॅश मार्केटमधील एका उत्तम शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदिप जैन यांचा स्टॉक


मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी आज कॅश मार्केटमधील एक दमदार शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. संदिप जैन यांच्या मते, Geojit Financial चा शेअर खरेदीसाठी चांगली निवड ठरू शकते. जाणून घेऊ या कंपनी आणि शेअरच्या फंडामेंटल संबधी सविस्तर माहिती...


Geojit Financial मध्ये गुंतवणूकीचा सल्ला


मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी आज कॅश मार्केटमधील शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. एलआयसीचा आयपीओ येणार आहे. अशातच या प्रकारातील कंपन्यांवर त्याचा प्रभाव दिसून येऊ शकतो. याशिवाय मार्केट दिग्गज राकेश झुनझुनवाला(Rakesh Jhunjhunwala)यांनी देखील या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे.


Geojit Financial -  बाय कॉल


सध्याची किंमत 78.60 रुपये
 लक्ष्य 90 रुपये
 
 कसे आहेत कंपनीचे फंडामेंटल्स?


 कंपनीचे रिटर्न ऑन इक्विटी 22 टक्के आहे. कंपनीचा डिविडंड यील्ड 5 टक्के आहे. कंपनी मागील 3-4 तिमाहीपासून 30 कोटी रुपयांहून अधिकचा नफा कमाई करीत आहे. या कंपनीचा बुक वॅल्यु 1700 कोटी रुपये आहे.