20 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूकीची संधी; कोट्यवधींच्या रिटर्न्ससाठी एक्सपर्ट्सचा सल्ला
Ujjvan SFB Stock to Buy | 20 रुपयांपेक्षा कमी असलेला हा स्टॉक आणखी 35 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की मार्च 2022 च्या तिमाहीत कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत.
मुंबई : Ujjvan SFB Stock Performance | जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारांवरही दिसून येत आहे. परंतू त्यातही अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले दिसत असल्याने, ब्रोकरेज हाऊसेस अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत आहेत. ICICI सिक्युरिटीज आणि अॅक्सिस सिक्युरिटीजने जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाही निकालानंतर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकच्या शेअरवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
20 रुपयांपेक्षा कमी असलेला हा स्टॉक आणखी 35 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की मार्च 2022 च्या तिमाहीत कंपनीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. कंपनीत वाढीचा वेग आहे.
Ujjvan SFB | 35 % पर्यंत अपेक्षित परतावा
चौथ्या तिमाहीच्या (Q4FY22) निकालानंतर, ब्रोकरेज फर्म Axis Securities ने Ujjvan SFB च्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. प्रति शेअर लक्ष्य किंमत 23 रुपये ठेवण्यात आली आहे. शेअरची सध्याची किंमत सुमारे 17 रुपये आहे. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना सध्याच्या किंमतीपासून सुमारे 35 टक्के इतका मजबूत परतावा मिळू शकतो.
ICICI सिक्युरिटीजने उज्जवन SFB वरील रेटिंग 'होल्ड' वरून 'बाय' वर अपग्रेड केले आहे. ब्रोकरेजने स्टॉकचे लक्ष्य 20 रुपये ठेवले आहे.
ब्रोकरेजचे मत
अॅक्सिस सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे चौथ्या तिमाहीचे निकाल आमच्या अंदाजापेक्षा चांगले आहेत. बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन (NIMs) वाढले आहेत. बँकेचा पत खर्च कमी झाला आहे, ज्यामुळे निव्वळ नफ्यात अपेक्षेपेक्षा चांगली सुधारणा झाली आहे.