भोपाळ : मध्यप्रदेशमधील बैतुलमध्ये मर्चंट नेव्हीत नोकरी देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. तमिळनाडूतील एका कंपनीने युवकाला आणि कुटुंबियांना नौदलात नोकरी देण्याचं सांगत, त्याला भांडी साफ करण्यासाठी नोकरीवर ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभर पसरलेल्या या ऑनलाईन फसवणुकीचे बळी असलेले तरुण आणि त्यांचे कुटुंबीय आता न्यायाच्या शोधात भटकत आहे. बैतुलमधील रानीपूर येथे राहणाऱ्या राकेश नावाच्या युवकाला  ग्वालियरहून फोन करण्यात आला. या फोनवरुन त्याला मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी देण्याचं सांगण्यात आलं. त्याची परिक्षा घेण्यात आली आणि परिक्षेत निवड झाल्यानंतर त्याला जयपूरला बोलावून, प्रशिक्षणासाठी मुंबईला पाठविण्यात आलं. त्याआधी सहा महिने प्रशिक्षणासाठी त्याच्याकडून ५० हजार रुपये घेण्यात आले होते. मुंबईत, सहा महिन्यांऐवजी केवळ १५ दिवस त्याचं प्रशिक्षण घेण्यात आलं आणि त्याला पुन्हा जयपूरला बोलावण्यात आलं. त्यानंतर गोव्यात नोकरीसाठी दाखल होण्याबाबत पत्रही देण्यात आलं. त्यासाठी पुन्हा त्याच्याकडून तीन लाख रुपये उकळण्यात आले. 


राकेश ज्यावेळी मर्चंट नेव्हीत रुजू होण्यासाठी गोव्यात पोहचला, त्यावेळी त्याला तिथे भांडी साफ करण्याचं काम देण्यात आलं. चार महिने त्याच्याकडून भांडी साफ करण्याचं काम करुन घेण्यात आलं आणि त्याबदल्यात त्याला तीन महिन्याचा पगार देण्यात आला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढून, या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. 


चार्मिंग स्टार्ट्स मेरीटाइट ऍकॅडमी आणि लॉयल्टी मरिन सर्व्हिस नावाची कंपनी तमिळनाडूतील गांधीपुरम कोयंबतूर येथे काम करत असल्याचं सांगते. याप्रकरणी पीडित राकेश धुर्वेने झी मीडियाशी बोलताना सांगितलं की, ग्वालियरहून फोन करण्यात आला  होता. तेथून दिव्या शर्मा नावाच्या महिलेकडून बोलावण्यात आलं. तेथे  परिक्षा घेण्यात आली. परिक्षेत पास झाल्यानंतर जयपूरला बोलावण्यात आलं. त्यानंतर प्रशिक्षणासाठी मुंबईत येण्यासाठी ५० हजार रुपये, त्यानंतर ३ लाख रुपये घेण्यात आले. 




चार महिन्यांनंतर एका व्यक्तीकडून दोन हजार रुपये उधार घेत तेथून पळ काढला असल्याचं राकेशने सांगितलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.