How to check your bank balance using Aadhaar card: आपल्या सर्वांसाठी आधार कार्ड ही आपली ओळख बनली आहे. आधार कार्ड सध्या भारतातील सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट मानलं जातं. याचा वापर तुम्ही विविध कारणांसाठी करू शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला अशी भन्नाट गोष्ट सांगणार आहोत, ज्याने तुम्ही चक्रावून जाल. कारण तुम्ही तुमच्या आधारचा वापर करून तुमचा बँक बॅलन्स चेक करू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या आधारचा वापर करून अगदी सहजतेने बिना इंटरनेट तुम्ही तुमचा बँक बॅलन्स चेक करू शकतात.


या गोष्टी महत्त्वाच्या :


  • सर्वात आधी तुमचा मोबाईल नंबर आधारशी जोडला गेलाय की नाही हे तपासून घ्या 

  • तुमचा आधार नंबर रजिस्टर्ड मोबाईलशी लिंक आहे की नाही,  हेही तपासून पाहा 


या पद्धतीने बिना इंटरनेटही तुम्ही तुमचा बँक बॅलन्स तपासू शकतात. महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा स्मार्टफोन नसेल तरीही तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यातील बॅनल्स चेक करू शकतात. 


पद्धत जाणून घ्या 


  • सर्वात आधी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून  *99*99*1# डायल करा  

  • यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी रजिस्टर्ड आधार नंबर टाकावा लागेल 

  • एकदा पुन्हा आधार नंबर टाकून कन्फर्म करावा लागेल 

  • सर्व माहिती टाकून झाल्यावर तुम्हाला एक मेसेज येईल 

  • UIDAI वरूनही तुम्हला एक मेसेज पाठवला जाईल 


मात्र बँक अकाऊंट बॅलन्स चेक करायच्या आधी तुम्हाला काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. सतर्क राहणं गरजेचं आहे. 


लक्षात ठेवा तुमच्या आधारचा गैरवापर काही समाजकंटकांकडून केला जाऊ शकतो. म्हणून, तुम्हाला सावधानता बाळगणं अनिवार्य आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून आधारबाबत कोणत्याही प्रकारची माहिती विचारली जात नाही. तुम्हाला आधारच्या OTP बाबतही सावधानता बाळगणे अनिवार्य आहे. जर तुम्ही फोनवरून तुमचा OTP देत असाल तर तुमच्यासोबत मोठा स्कॅम होऊ शकतो याची सावधानता बाळगा. 


How to check your bank balance using Aadhaar card