जनावरांना आईप्रमाणे दूध पाजणारी महिला, Photo Viral
मिशलिन स्टार अवॉर्ड विजेता शेफ विकास खन्नाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत.
नवी दिल्ली : मिशलिन स्टार अवॉर्ड विजेता शेफ विकास खन्नाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत.
विकास खन्नाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोची जोरदार चर्चा. या फोटोत एक महिला हरणाच्या बछड्याला दूध पाजताना दिसत आहे. फोटो शेअर करताना विकास खन्नाने सांगितले की, मानवेते सर्वात मोठे रूप दया आहे. त्यासोबत त्याने हे देखील लिहिले आहे की, बिन्श्रोई समाजाच्या या महिलेने त्या बछड्याला दूध पाजल्यानंतर सांगितले की, तिने राजस्थानच्या वाटवंटात अनेक जखमी आणि अनाथ बछडे पाहिले आहे. आणि तिने त्यांचा जीव देखील वाचवला आहे. या फोटोला आतापर्यंत २८ हजारपेक्षा अधिल लाइक्स मिळाले आहेत.
राजस्थानच्या बिन्श्रोई समाजात शेकडो वर्षांपासून जनावरांना आपल्या मुलांप्रमाणे पाळण्याची पद्धत आहे. या समाजाच्या महिला जानवरांना फक्त बाळासारखं सांभाळतच नाही तर त्यांना आपलं दूध देखील पाळतात. या समाजाची मुलं देखील या जनावरांसोबतच खेळत वाढतात. त्यामुळे ते लहानपणापासूनच त्यांना आपल्या कुटुंबाचा सदस्य समजतात. हरणाचे बछडे देखील या कुटुंबासोबत अगदी सहजपणे वावरतात. त्यामुळे या दोघांमध्ये एक भावनिक नातं तयार होतं.
बिन्श्रोई समाजाचा बद्दल थोडंस
बिन्श्रोई समाजाला हे नाव भगवान विष्णूकडून मिळाले आहे. या समाजाचे लोक पर्यावरणाची पूजा करतात. त्यामुळे त्यांना या प्रकृतीच्या अगदी जवळ समजलं जातं. या समाजाचे लोक जास्त करून जंगल आणि वाळवंटात राहतात.
या समाजाच्या ३६३ लोकांनी झाडांसाठी गमावला आपला जीव
१७३६ साली खेजडली गाव त्या आसपासच्या परिसरात भरपूर झाडं आहेत. दरबारचे लोक इथे झाडं कापण्यासाठी आले होते तेव्हा संपूर्ण गावाने विरोध केला होता. अमृतादेवी बिन्श्रोईने गुरू जम्भेश्वर महाराजची शप्पथ देऊन झाडाला बिळगून होत्या. त्यांना बघताच इतर लोकांनी देखील हेच केले. तेव्हा दरबारच्या लोकांनी अनेकदा विरोध करूनही गावकरी विभक्त झाले नाहीत तेव्हा त्यांच्यात संघर्ष झाला. ज्यामध्ये ३६३ लोक मारले गेले.