नवी दिल्ली : अंदमान निकोबार बेटांना सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी भेट दिली. केंद्र सरकारने येथे सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल टाकली आहे, ज्याद्वारे संपूर्ण बेटावर फोन-इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. हा प्रकल्प बीएसएनएलमार्फत पूर्ण झाला असून केबल समुद्राखालून टाकण्यात आली आहे. आता हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर अंदमान निकोबारला प्रति सेकंद 400 जीबी पर्यंत वेग मिळेल. हा प्रकल्प विशेष का आहे आणि त्यातील मुख्य गोष्टी काय आहेत हे जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- चेन्नई ते पोर्ट ब्लेअर पर्यंत समुद्राखालून 2313 कि.मी. केबल टाकली गेली आहे


- यासाठी एकूण 1224 कोटींचा खर्च आला आहे.


- ही केबल स्वराज बेट, लिटिल अंदमान, कार निकोबार, कामोरोता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड, रंगत येथे जाईल.


- पोर्ट ब्लेअरला प्रति सेकंद 400 जीबी पर्यंत आणि इतर बेटांवर 200 जीबी प्रति सेकंदाची गती मिळू शकते.


- बीएसएनएलने हा प्रकल्प पूर्ण केला, 24 महिन्यांच्या आत समुद्रात केबल टाकली गेली.


- सुरुवातीला बीएसएनएलचे नेटवर्क कार्य करेल, परंतु नंतर खासगी कंपन्यांना संधी मिळेल. अशा परिस्थितीत अंदमानला 4 जी सेवा देखील उपलब्ध होईल


- या प्रकल्पाच्या सहाय्याने टेलि-एज्युकेशन, टेलि-हेल्थ, ई-गव्हर्नन्स, टुरिझम या क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे.


- हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये सुरू केला होता आणि आज त्यांनी त्याचे उद्घाटन केले.


पंतप्रधानांनी सोमवारी म्हटलं की, 15 ऑगस्ट साजरा करण्यापूर्वी अंदमानच्या लोकांना ही भेट आहे. आता जेव्हा लोक तिथे येतात तेव्हा ते बराच काळ थांबण्याचा प्रयत्न करतील कारण तेथे आता कनेक्टिव्हिटीची समस्या उद्भवणार नाही. तसेच पर्यटनाला चालना मिळेल.


पंतप्रधानांनी जाहीर केले आहे की लवकरच पोर्ट ब्लेअरला जवळच्या इतर बेटांशी जोडण्यासाठी जलवाहिनी तयार केली जाईल, नद्यांना जोडून देशात यावर काम सुरू आहे.