रायपूर : छत्तीसगडमध्ये नक्षलप्रभावित बीजापूर आण सुकमा जिल्ह्यांच्या सीमेवर सुरक्षा बलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यात सुरक्षा बलाचे 22 जवान शहीद झाले. दरम्यान 15 जवान बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना बीजापूर आणि रायपूरच्या रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आले आहे. या चकमकीत 9 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.


गुप्तचर यंत्रणांनी आधीच दिली सूचना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीजापूर एनकाऊंटरच्या आधी गुप्तचर यंत्रणांनी आधीच जवानांना अलर्ट केले होते. काही दिवसांपासून 200 ते 300 नक्षलवादी या परिसरात गस्त घालत होते, असे रिपोर्ट गुप्तचर यंत्रणांकडे आले होते.  याआधारे सुरक्षा बलाच्या जवानांनी मोठे ऑपरेशन लॉंच केले. 



 



राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शहीदांना वाहिली श्रद्धांजली



गृहमंत्री अमित शाह यांनीही वाहिली श्रद्धांजली