छत्तीसगढ : रमण सरकारमधील एका मंत्र्याच्या अश्लिल सिडी प्रकरणी पत्रकार विनोद वर्मा यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दोनी पक्षकारांमध्ये सोमवारी सुमारे दीड तास सुनांवनी चालली. त्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनावनी दरम्यान आरोपी विनोद वर्मा यांच्या वतीने वकील सुदीप श्रीवास्तव यांनी काम पाहिले. तर, या प्रकरणात जेएमएफसी भावेश बट्टी यांच्यासमोर झालेल्या सुनावनीत पोलीस दप्तपरी असलेली नोंद आणि इतर कागदपत्रे घेऊन पोलिस हजर होते. 


दरम्यान, छत्तीसगढ पोलिसांनी पत्रकार विनोद वर्मा यांना गाजियाबाद मधील इंदिरापुरम येथून त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. दुसऱ्या बाजूला मंत्री राजेश मूणत यांनी आगोदरच आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. एका पत्रकार परिषदेत बोलताना मूणत यांनी सांगीतले की, आपल्याला या प्रकरणाबद्धल सुरूवातीला माहिती नव्हती. पण, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला ही कथीत सीडी आणि या प्रकरणाबद्धल माहिती मिळाली.


या प्रकरणात पत्रकार विनोद वर्मा यांच्याविरूद्ध छत्तीसगढ पोलिसांनी पंडरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्यावर आयपीसी कलम ३८४, ५०६ आणि आयटी अॅक्ट अन्वये आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपांखालीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.


पोलिसांनी विनोद वर्मा यांच्या घरातून तब्बल ५०० सीडी, २ लाख रूपये रोख रक्कम, एक लॅपटॉप आणि एक डायरी जप्त केल्याचीही माहिती आहे. ते १३ नोव्हेंबरपर्यंत तुरूंगातच असणार आहेत.