नक्षलवाद्यांचा पत्रकारांमार्फत निरोप - कोब्रा बटालियनचा तो जवान आमच्या ताब्यात आहे; पण ही अट आधी पूर्ण करा
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहेत, अशी बातमी समोर आली आहे.
छत्तीसगड : छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता असलेल्या सुरक्षा दलाचे जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहेत, अशी बातमी समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी पत्रकारांकडे फोनवरुन या गोष्टीचा दावा केला आहे. त्यांनी आम्ही जवानांना काहीही इजा करणार नाही, असे सांगितले आहे. मात्र, त्यांच्या सुटकेसाठी अट घातली आहे.
जम्मू-काश्मीरमधील राजेश्वर बेपत्ता
राजेश्वर सिंग मनहास असे बेपत्ता झालेल्या जवानाचे नाव आहे. तो जम्मू-काश्मीरमधील रहिवासी आहे, आणि कोब्रा बटालियनचा भाग आहे. नक्षलवाद्यांनी पत्रकारांना बोलावून अशी अट घातली की, ते राजेश्वरसिंगला सोडून देण्यास तयार आहेत, परंतु राजेश्वर सिंग सुरक्षा दलात या पुढे काम करणार नाही, आणि ही नोकरी सोडून इतर काही काम करेल, असे वचन त्यांना द्यावे लागेल.
कुटूंब वाईट परिस्थितीत
राजेश्वर सिंग यांचे कुटुंब अत्यंत वाईट अवस्थेत आहे. त्यांना कंट्रोल रूममधून सांगण्यात आले की, राजेश्वर बेपत्ता आहेत. तर वृत्तवाहिन्या राजेश्वर सिंग नक्षलवाद्यांच्या ताब्यात असल्याचे सांगित आहे. त्यामुळे काय खरे आणि काय खोटे? कोणावर विश्वास ठेवावा हे त्यांना समजत नाही. राजेश्वरची आई, पत्नी आणि लहान मुलगी यांचे हाल रडून रडून वाईट हाल झाले आहेत.
बायकोची सरकारकडे मागणी
राजेश्वर यांच्या पत्नीने छत्तीसगड सरकारकडे अशी मागणी केली आहे की, 'नक्षलवाद्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जाव्यात आणि माझ्या पतीला सोडण्यात यावे. माझे पती जवळजवळ चार वर्षांपासून कोब्रा कमांडोजमध्ये ड्यूटीवर आहेत. सरकारला कोणत्याही किंमतीत आपले जवान परत आणावे लागतील. तो फक्त माझा नवरा नाही, तो देशाचा जवान देखील आहे. सीआरपीएफमध्येअसताना तिच्या सासरेही शहीद झाल्याचं' त्याच्या पत्नीने म्हटले आहे.
आईचे पंतप्रधान मोदींना आवाहन
राजेश्वरची आईचे म्हणने आहे की, "शुक्रवारी साडे नऊ वाजता मुलगा राजेश्वर माझ्या सोबत बोलला. त्यावेळी तो म्हणाले की, 'मी ऑपरेशनवर जात आहे, मी शनिवारी परत फोन करेन.' त्यानंतर त्याचा काहीही पत्ता नाही. आम्ही फोन करत आहोत, परंतु त्याची काहीच माहिती नाही. माझा मुलगा लवकरच परत आला पाहिजे.
तो माझा आधार आहे." असे आवाहन राजेश्वर सिंगच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे. राजेश्वरच्या घरातील लोकांनी सांगितले की, त्याचा मेव्हणा लग्न करणार आहे. त्याची बायको त्याच्या तयारीत व्यस्त होती. तो ऑपरेशनमध्ये गेल्याचे तीन दिवसांपूर्वी उघड झाले आहे.
नक्षलवाद्यांकडून यू-आकारात घेरुन सुरक्षा दलावर गोळीबार
शनिवारी विजापूरच्या तारिम भागात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाला तिन्ही बाजूंनी घेरले आणि त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. नक्षलवाद्यांच्या अंदाधुंद गोळीबारात सुरक्षा दलाचे 22 हून अधिक जवान शहीद झाले. तर दोन डझनहून अधिक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी राजधानी रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.