पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गेले काही महिने आजारी आहेत. त्यामुळे गोव्यातील कारभार ठप्प आहे. तसा आरोप विरोधकांनी केलाय. मात्र, मुख्यमंत्री भेटत नसल्याने पक्षातील बंडाली उफाळली होती. आज अखेर मुख्यमंत्री पर्रिकर यांनी आपल्या घरी गोवा आयपीबीची बैठक बोलावली. या बैठकीत सात प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. 230 कोटींच्या कामांचे हे प्रस्ताव असून 400 लोकांना रोजगार मिळणार आहे, असे गोवा मुख्यमंत्री कार्यालयलाने स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अलिकडे अनेक मंत्री भेटलेले नाहीत, फोनवरही त्यांच्याशी बोललेले नाहीत. मुख्यमंत्री गेले काही महिने म्हणजे गणेश चतुर्थीपासून मंत्रालयातही आलेले नाहीत. अशा परिस्थितीत मनोहर पर्रिकर अनेक महिन्यांच्या खंडानंतर आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याच्या तयारीत आहेत. 1 नोव्हेंबर रोजी ते बैठक घेण्याची शक्यता आहे.



त्यापूर्वी आज ते गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बैठक घेतली. त्यामुळे त्यांच्याविषयी  सुरू असलेल्या अफवांवर पडदा पडला आहे. 
पर्रिकर खूप आजारी आहेत. त्यामुळे ते घराबाहेर पडू शकत नाहीत. दिल्लीतील एम्स इस्पितळातून 14 ऑक्टोबरला त्यांना डिस्जार्च देण्यात आला. यानंतर ते थेट त्यांच्या निवासस्थानी आले. आजारपणामुळे गेले अनेक महिने ते मंत्रिमंडळाची बैठक घेऊ शकलेले नाहीत. 


अचानक त्यांनी दोनापावल- करंजाळे येथील आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक बोलावल्याने मुख्यमंत्री आपल्याशी नेमके काय बोलणार आणि बैठकीत कोणता निर्णय होणार याविषयी मंत्र्यांमध्ये उत्सुकता आहे. बैठकीला मंडळाचे सदस्य सभापती डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री बाबू आजगावकर, अत्रेय सावंत, यतीन काकोडकर, राजकुमार कामत उपस्थित होते.