नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये बुधवारी कुन्नूर क्षेत्रात सैन्यदलाचं हेलिकॉप्टर क्रॅश होऊन एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चीफ ऑफ डिफेन्स अर्थात CDS म्हणजेच देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत हेसुद्धा जखमी झाल्याचं कळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिगेडियर रँकचे अधिकारी यांच्यासह काही इतरही अधिकारी आणि दोन पायलट यावेळी हेलिकॉप्टरमध्ये होते. सूत्रांच्या माहितीनुसार जनरल रावत यांच्या पत्नीसुद्धा यावेळी त्यांच्यासोबतच होत्या. 


एमआय सीरिजमधील हे हेलिकॉप्टर कोईंबतूरच्या सुरूर वायुदल तळावरुन कुन्नूरमधील वेलिंग्टनला जात होतं. 


अचानकत हवामानात बदल झाल्यामुळं हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. 


हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर सदर भागामध्ये एकच गोंधळ पाहायला मिळाला. 



स्थानिक आणि बचावकार्यासाठी पोहोचलेल्यांच्या माहितीनुसार या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमधील काहीजण आगीमुळे होरपळले आहेत.


वायुदलाकडून सदर अपघातानंतर माहिती देणारं ट्विट प्रसिद्ध करण्यात आलं. शिवाय या अपघाताची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आल्याचं कळत आहे. 



जनरल बिपिन रावत, CDS,  मधुलिका रावत, बिपिन रावत यांच्या पत्नी,  ब्रिगेडियर एल. एस. लिद्दर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंह हे या हेलिकॉप्टरमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. 



शिवाय नायक गुरसेवक सिंह, नायक जीतेंद्र कुमार, लांस नायक विवेक कुमार, लांस नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल यांची नावंसुद्धा समोर येत आहेत.