मुंबई : लहान मुलाचा प्रवास म्हटलं की सर्व ती काळजी करावी लागते. पण प्रवासात अडचण आली तर खूप मोठी पंचायत होते. अशीच पंचायत रेल्वेने प्रवास करणाऱ्या आईची झाली. पण रेल्वे मंत्र्यांची तत्परता यावेळी कामी आली. आणि बाळासाठी चक्क रेल्वेच 'धाराऊ' झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या रेल्वेतून एक महिला आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला घेऊन प्रवास करत होती. बाळाला भूक लागल्यामुळे तो प्रचंड रडू लागला. आईला मुलाचं हे रडणं आईला काही केल्या थांबवता येत नव्हतं. अखेर तिने रेल्वे मंत्र्यांना ट्विट केलं. 


रेल्वे मंत्र्यांना ट्विट करण्यापूर्वी अंजली तिवारी नावाच्या महिलेने फोन करून आपल्या कुटुंबियांशी संवाद साधला. ट्विट करण्याबाबत चर्चा केली. महत्वाच म्हणजे रेल्वे मंत्र्यांना ट्विट करताच अवघ्या २३ मिनिटांत कानपुर सेंट्रलवर बाळाला रेल्वे प्रशासनाने दूध उपलब्ध केलं. महिलेने फोन करून रेल्वे अधिकाऱ्यांचे आभार मानले 


सुल्तानपूरला जात होती महिला 


मूळची सुलतानपूरची रहिवासी असलेली अंजली तिवारी तिच्या दोन मुलांसह घरी येण्यासाठी LTT एक्सप्रेसच्या B-1 कोचच्या 17 आणि 20 क्रमांकावर चढली. ट्रेन 14.30 वाजता भीमसेन स्टेशनवर पोहोचणार होती, तेव्हा त्याचे मूल भुकेने रडायला लागले.


मुलाला शांत करण्याचे अनेक प्रयत्न केले पण यश मिळू शकले नाही. कुटुंबीयांशी बोलल्यानंतर सकाळी 14.52 वाजता रेल्वेमंत्र्यांना ट्विट केले. तोपर्यंत ट्रेन भीमसेन स्टेशनहून निघून गेली होती. या ट्विटनंतर रेल्वे प्रशासन सक्रिय झाले. कानपूर सेंट्रल डेप्युटी सीटीएम हिमांशू शेखर उपाध्याय यांच्या सूचनेनुसार, एसीएम संतोष त्रिपाठी यांनी मुलासाठी दुधाची व्यवस्था केली. ट्रेन 15.15 वाजता कानपूर सेंट्रलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक नऊवर आली तेव्हा डब्यात जाऊन गरम दूध दिले.


संतोष त्रिपाठी यांनी अंजलीशी फोनवर चर्चा केली असता त्यांनी या मदतीबद्दल रेल्वे विभागाचे आभार मानले. ही ट्रेन 8 मिनिटांनी कानपूरहून सुलतानपूरकडे रवाना झाली.