नवी दिल्ली : चीनने भारताच्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये अडचण निर्माण केल्याचं दिसत आहे. दक्षिण भारतातील भारताचा हायस्पीड ट्रेन प्रोजेक्टसंदर्भात चीनी रेल्वेतर्फे कुठलीच प्रतिक्रिया मिळत नाहीये. त्यामुळे भारताचा हा प्रकल्प अडचणीत आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, याच्या मागचं महत्वाचं कारणं म्हणजे डोकलाम वाद असू असल्याचं बोललं जात आहे. रेल्वेच्या नऊ उच्चगती प्रकल्पांच्या संदर्भात मोबॅलिटी निर्देशनालयाकडून ही माहिती समोर येत आहे.


चीनी रेल्वे मंत्रालयाने दिलं नाही उत्तर


अशी माहिती समोर आली आहे की, 492 किमी लांब चेन्नई-बंगळुरु-मैसुर हा प्रकल्प अर्धवट आहे कारण यासंबंधी चीनी रेल्वे मंत्रालयाने कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये. चीनच्या कंपनीने नोव्हेंबर 2016च्या शेवटी एक अहवाल सादर केला होता आणि त्यानंतर समोरा-समोर चर्चा करण्याचं सुचवलं होतं. मात्र, याची तारीख निश्चित होऊ शकलेली नाहीये.


असेही म्हटलं गेलं आहे की, चीन रेल्वे एरीयुआन इंजिनिअरिंग ग्रुप कंपनी लिमिटेड (सीआरईईसी)ने नोव्हेंबर 2016 मध्ये एक अहवाल सादर केला होता. अधिकाऱ्यांच्या मते, बोर्ड सीआरईईसीच्या संपर्कात नाहीये. गेल्या सहा मिहन्यांत त्यांना अनेक ई-मेल पाठविण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच दूतावासासोबतही संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, संपर्क होऊ शकलेला नाही.